रंगी नाचे क्षेत्रपाळ
3933.
रंगी नाचे क्षेत्रपाळ । आग्या चैतन्यावेताळ । ब्रह्मानंदाचा गोंधळ । सुख सुकाळमाजविला ॥१॥ सिध्दा जाग रे जगजोगी । सिध्दाजाग रे जग जोगी॥ध्रु.॥अनुहाताची डंबरी । बोधत्रिशुळ घेऊनी करी । नाचे चैतन्य चावरीं । मुखसाहाकारी बहिरव॥२ । चित्त चैतन्य योगिनी । मोहमहिषासुर मर्दिनी । एका जनार्दनाचे चरणी । भवभवानी नाचती ॥३॥
