अभिमानाच्या भुली ।
876.
अभिमानाच्या भुली ।
ज्या त्या कर्मी लिप्त झाली ॥१॥
नेणोनिया ज्ञानमूढे ।
भोगासक्त पुढे पुढे ॥२॥
म्हणती अंगे आम्ही केले ।
सहजे जे जे घडोनि आले ॥३॥
निळा म्हणे मत्ते ऐसी ।
गुंतली ते काळापाशी ॥४॥
876.
अभिमानाच्या भुली ।
ज्या त्या कर्मी लिप्त झाली ॥१॥
नेणोनिया ज्ञानमूढे ।
भोगासक्त पुढे पुढे ॥२॥
म्हणती अंगे आम्ही केले ।
सहजे जे जे घडोनि आले ॥३॥
निळा म्हणे मत्ते ऐसी ।
गुंतली ते काळापाशी ॥४॥