आंधळिया उगवोनी रवी ।
645.
आंधळिया उगवोनी रवी ।
न दिसेचि तेवि मज झाले ॥१॥
तेवी तुम्ही स्वत:सिध्द हरी ।
परि मी माझारी भ्रांतीतमा ॥२॥
रोग्यारसने कैची गोडी ।
जे ते निवडी रसस्वाद ॥३॥
निळा म्हणे वेडिया गोत ।
नाढळे धन वित्त दरिद्रिया ॥४॥
645.
आंधळिया उगवोनी रवी ।
न दिसेचि तेवि मज झाले ॥१॥
तेवी तुम्ही स्वत:सिध्द हरी ।
परि मी माझारी भ्रांतीतमा ॥२॥
रोग्यारसने कैची गोडी ।
जे ते निवडी रसस्वाद ॥३॥
निळा म्हणे वेडिया गोत ।
नाढळे धन वित्त दरिद्रिया ॥४॥