गावगुंड ३९३८ ते ३९३९
3938.
गावगुंड ३९३८ ते ३९३९
अरे अरे गांवगुंडा । क्षीरसागरीच्यापुंडा । हातांघेऊनको धोंडा । भुलविशील गांवच्यारांडा । तर तर उगाच राहीं रे गांवगुंडा ॥१॥ देशोदेश देशांतरीं । आमची गारूड्याची थोरी । तुझ्याचगांवची नवरी । शेलकीमुसलमानाची पोरी । ती दासी करीन आपुल्या घरी रे गांवगुंडा ॥२॥ गांवगुंड बोले रे चावटा । पोरी नेता लावीन तुलातीन वाटा । तुझ्या कंबरेचा मोडीन कांटा । रिकामानको आणूंरेथाटगांवगुडा ॥३॥ अरेगारूड्याच्यापोरा । कारिका लावितोस दरारा । तुझ्याआईबापाला होता काथारा । म्या सत्त्वगुण सोडीलावारा । म्हणून हा जगडंबर पसारा । आवर की रेगारूड्या ॥४॥ धेड मांग कितीएक आले । आणियेवोनियां कितीएक गेले । ते जन्ममरण विन्मुखझाले । एका जनार्दनी निवांत राहिले रेगारूड्या ॥५॥
