वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 144. प्रल्हादचरित्र - अभंग ३४१४ ते ३४३०

स्तंभ फ़ोडीत कटकट । द

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087349 · अभंग क्र. ३४३०

3430.
स्तंभ फ़ोडीत कटकट । दाढा व्यंकट विकट । उध्दट वीर विकट । नरकेसरी ॥१॥
जिव्हा लळलळित लटलट । धुरधुरीत कंठ । श्वासें नासापुट उतट । पिंगट जटाजूट दाट ॥२॥
बाण सणसणाट । वज्र दणद्णाट । नखे तिखें तिकट बोट । रागे फ़ोडी पोट ॥३॥
हात तट सुभट भट । नेत्र गरगराट । चंद्र सूर्य गरगराट रे ॥४॥
शब्द कट कट । साधनी कष्ट फ़ुकट । एका जनार्दनी नामे वैकुंठपीठ रे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग