वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

चरणरज लागुनी उद्धरली

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087578 · अभंग क्र. ७५४

754.
चरणरज लागुनी उद्धरली अहिल्या बाळा । रामा तुझेनि प्रतापें तरली भवसागर शीळा ॥१॥
जयजय रामरामा शामा भवभंजन नांवे । तुझे रुप ध्याता उमा शिवे निवे ॥२॥
रामनामे कळिकाळ कापती सदा । रामनामे गणिका नेली निजपदा ॥३॥
रामनामे उद्धरले सुर नर वानर । एका जनार्दनी सदा समाधि स्थिर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग