तिहींचे त्रिगुणे रजत
212.
तिहींचे त्रिगुणे रजतममिश्रित । त्यामाजि त्वरित जन्म माझा ॥१॥
सर्व पुण्य चोख आचरलो आम्ही । तरिच ये जन्मी भक्ति आम्हा ॥२॥
शांति क्षमा दया निवृत्ति माउली । अखंड साउली कांसवदृष्टि ॥३॥
निवृत्ति म्हणे तेंचि गा जीवन मोल । भिवरा विठ्ठल दैवत आम्हा ॥४॥
अर्थ:
माझा जन्म सत्व, रज, तम ह्या तिन्ही गुणांच्या मुळे त्याच्या इच्छेने लवकर झाला. आम्ही निष्काम पुण्याई मुळे ह्या जन्मी भक्ती करायला आधिकारी झालो.कासवी जशी प्रेमपान्हा नजरेतुन पाजुन पिले जगवते तसे शांती दया क्षमा देऊन त्याने मला जगवले. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या भिवरे काठच्या विठुमाऊली मुळे आमच्या जीवनाला मोल आले.
