आधी शुद्ध करा भाव ।
3243.
आधी शुद्ध करा भाव । पाठी पहा मग देव ॥१॥
नका पडुं वाया भरी । चित्त नागवें निर्धारी ॥२॥
भाव जाहलिया शुद्ध तत्त्वता । मग देव होय प्राप्ता ॥३॥
एका जनार्दनी देव । जेथे जाय तेथे आहे ॥४॥