विठ्ठल नाही ज्या ठाउ
884.
विठ्ठल नाही ज्या ठाउका ।
परमार्थचि त्याचा लटिका ॥१॥
करितो ते पोटासाठी ।
बाष्कळ अवघीच चावटी ॥२॥
दावील ते जाणा सोंग ।
धरुनि परमार्थाचे अंग ॥३॥
निळा म्हणे टिळे माळा ।
धरिला वृथा तो भोंपळा ॥४॥
884.
विठ्ठल नाही ज्या ठाउका ।
परमार्थचि त्याचा लटिका ॥१॥
करितो ते पोटासाठी ।
बाष्कळ अवघीच चावटी ॥२॥
दावील ते जाणा सोंग ।
धरुनि परमार्थाचे अंग ॥३॥
निळा म्हणे टिळे माळा ।
धरिला वृथा तो भोंपळा ॥४॥