डाका ३९३६
3936.
डाका ३९३६
सुंदरे चिद्घने माझे रंगा येई वो माते । वाजविली डाक सत्वर पावें दिनानाथे वो ॥१॥ भरिला हदयीं चौक भोग आनंदा घातला । सोहंसुमनमाळा घट पुर्णत्वे भरिला वो॥२ । अहं धुप । जाळोनी भावे केली धुपारती वो । लाउनी त्रिगुणवाती केली चिन्मय आरती वो ॥३॥ छेदुनी भेदवचनषड्रस पक्वाने वो । पुर्ण पात्र भरुन के लेंआत्मनिवेदन वो ॥४॥नाचती वैष्णव रंगी करतीजयजयकार वो । भावाचे दर्शन गळा तुळशीचे हारवो ॥५॥ ऐसे स्तवन करिता अंबा आलीसे रंगणीवो । कायावाचामनें शरण एका जनार्दनी वो ॥६॥
