वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 124. श्रीकृष्णलीला

जेथे नाही कांही नाम

🙏 4. संत नामदेव · ABH-083810 · अभंग क्र. २२८

228.
जेथे नाही कांही नाम रूप गुण । बोलती निर्गुण तयालागी ॥१॥
तोचि गोकुळांत होउनि गोवळ । म्हणवितो बाळ यशोदेचा ॥२॥
चिन्मय चिद्रुप अक्षई अपार । परेहूनि पर ह्मणती ज्याते ॥३॥
सर्वा भूताचे फुटकिये खोळे । भरले न गळे आत्मपणे ॥४॥
आनंदी आनंद मातला अपार । वेदालाही पार नाही ज्याचा ॥५॥
नामा ह्मणे सर्वरूपे जे रूपस । गोकुळी विलास मांडियेला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग