देव सांगे तुझी सामोग
227.
देव सांगे तुझी सामोग्री हे करा । सांगेन प्रकारा जाणो-निया ॥१॥
तेणे सर्व काज साधेल तुमचे । ठेविले ठायींचे ठायी पडे ॥२॥
घ्यारे आता वरी मृत्तिका गाळुनी । सराटे वेंचुनी वोंटी भरा ॥३॥
डांगा एक आणा वेंचुनीया खडे । निघावे रोकडे एकसरा ॥४॥
नामा ह्मणे ऐसे ऐकता गोपाळ । नाचती सकळ कृष्णापुढे ॥५॥
