कीर्तनी प्रल्हाद तरल
1398.
कीर्तनी प्रल्हाद तरला । बिभीषण मुक्त जाला ॥१॥
ऐसा कीर्तनमहिमा । गनिका नेली निजधामा ॥२॥
तारिले वानर असुर । कीर्तनी पावन चराचर ॥३॥
गाई गोपाळ सवंगडे । कीर्तनी तरले वाडेंकोडें ॥४॥
अजामेळ उद्धरिला । कीर्तनी आल्हाद भला ॥५॥
एका जनार्दनी कीर्तन । कली कल्मष नाशीं क्षण ॥६॥
