कीर्तनाची आवडी मोठी
1397.
कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमे देव घाली मिठी ॥१॥
कीर्तन प्रिय पै गोविंदा । आदरे पूजितो नारदा ॥२॥
कीर्तन करिता अभेदु । आदरे रक्षिला प्रल्हादु ॥३॥
राजेंद्र करी नामस्मरण । धांवण्या धांवे नारायण ॥४॥
एका जनार्दनी कळवळा । भक्तालांगीं देव भोळा ॥५॥
