वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

का सांडिसी गृहाश्रम

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072836 · अभंग क्र. ६०

60.
का सांडिसी गृहाश्रम । का सांडिसी क्रियाकर्म ।
कासया सांडिसी कुळींचे धर्म । आहे ते वर्म वेगळेची ॥१॥
भस्मउधळण जटाभारु । अथवा उदास दिगंबरु ।
न धरी लोकांचा आधारु । आहे तो विचारु वेगळाची ॥२॥
जप तप अनुष्ठान । क्रिया कर्म यज्ञ दान ।
कासया इंद्रिया बंधन । आहे ते निधान वेगळेंची ॥३॥
वेदशास्त्र जाणीतले । आगमी पूर्ण ज्ञान झाले ।
पुराणा मात्र धांडोळिले । आहे ते राहिले वेगळेंची ॥४॥
शब्दब्रम्हे होसी आगळा । म्हणसी न भिये कळिकाळा ।
बोधेंविण सुख सोहंळा । आहे तो जिव्हाळा वेगळाची ॥५॥
याकारणे श्रीगुरुनाथु । जंव मस्तकी न ठेवी हातु ।
निवृत्तिदास असे विनवितु । तंव निवांतु केवि होय ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग