वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

जंववरी रे तंववरी जंब

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072827 · अभंग क्र. ६१

61.
जंववरी रे तंववरी जंबुक करी गर्जना । तंव त्या पंचानना देखिले नाही बाप ॥१॥
जंववरी रे तंववरी वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाही बाप ॥२॥
जंववरी रे तंववरी मैत्रत्व संवाद । जंववरी अर्थेसि संबंध पडिला नाही बाप ॥३॥
जंववरी रे तंववरी युद्धाची मात । जंव परमाईचा पूत देखिला नाही बाप ॥४॥
जंववरी ते तंववरी समुद्र करी गर्जना । जंव अगस्ती ब्राम्हणा देखिले नाही बाप ॥५॥
जंववरी ते तंववरी बाधी हा संसार । जंववरी रखुमादेविवरा देखिला नाही बाप ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग