वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

घरदार वोखटे त्यजू म्

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072848 · अभंग क्र. ५९

59.
घरदार वोखटे त्यजू म्हणसी तरी शरीराएवढ जाड ।
माय बाप वोखटी त्यजू म्हणसी तरी अहंकार अविद्येचे कोड ।
बंधु सखे त्यजू म्हणसी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड ।
बहिणी पाठीच्या त्यजू म्हणसी आशा तृष्णा मायाचे बंडरया ॥१॥
त्यजिले ते काय कासया म्हणजे सांग पा मजपासी ऐसे ।
जया भेणे तू जासी वनांतरा तंव तुजचि सरिसे रया ॥२॥
स्त्री वोखटी त्यजू म्हणसी तरी कल्पने एवढी भोक्ती ।
पुत्र अपत्य त्यजू म्हणती तरी इंद्रियासी नाही निवृत्ति ।
सकळ गणगोत त्यजू म्हणसी तरी हे अष्टधा प्रकृति ।
अवघेचि त्यजू पाहे म्हणसी तरी मनी नाही नजि शांति रया ॥३॥
अवघेचि तुज जवळी दुमदुमित असता वरी वरी मुंडसी का करिसी विटंबना ।
सहज संतोषे असोनि जैसा तैसा परि तो सदगुरु पाविजे खुणा ।
आपुले आश्रमी स्वधर्मी असता सर्वत्र एकुचि जाणा ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु इतुकियासाठी नेईल वैकुंठभुवना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग