न देसी ते माझे भांडव
490.
न देसी ते माझे भांडवल हरि ।
येक तरी करी पांडुरंगा ॥१॥
आण वाहूनिया देई मज क्रिया ।
सोडीना मी पाया मनातूनी ॥२॥
विश्वासघातकी ऐसे मज वाटे ।
फासे करी विटेवरी उभा ॥३॥
बहेणि म्हणे पाचामध्ये घेई आण ।
मग मी जाईन कळेल तेथे ॥४॥
