किती एक लोक मागताची
491.
किती एक लोक मागताची मेले ।
तैसे हे न चाले पांडुरंगा ॥१॥
घेईन निश्चये न सोडी सर्वथा ।
विश्वास हा तआता काय तुझा ॥२॥
अवचिता येथे पाहिलासे दृष्टी ।
पहाता ये सृष्टीअकस्मात ॥३॥
आता कोण तुझा दरील विश्वास ।
बहु हो आयुष्य पुंडलिका ॥४॥
फार सीण त्याचा घेतला अच्युता ।
त्याच पुण्ये आता देखिलासी ॥५॥
बहेणि म्हणे लोभ आता सांडी हरी ।
थोरपणा धरी पांडुरंगा ॥६॥
