नव्हे ब्रम्हचर्य बाई
205.
नव्हे ब्रम्हचर्य बाईलेच्या त्यागे । वैराग्य वाउगे देश-त्यागे ॥१॥
काय वाढे भय वासनेच्या द्वारे । सांडावे ते धीरे आचावाचा ॥२॥
कापवूनी टिरी शूरत्वाची मात । केले वातहात उचित काळे ॥३॥
तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटक्याची मूळ स्तुती होता ॥४॥
