कोठे एक कोठे दोन । आ
59.
कोठे एक कोठे दोन । आहे परिपूर्ण पंढरीये ॥१॥
कोठे देव कोठे तीर्थ । आहे सर्व पंढरीये ॥२॥
कोठे आसन कोठे वसन । विटे समचरण पंढरीये ॥३॥
कोठे निजे कोठे बैसे । उभाची असे पंढरीये ॥४॥
चोखा म्हणे कोठे कांही । उभारूनी बाही पंढरीये ॥५॥
