एक वेळा पंढरी वाचे ज
58.
एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी । मोक्ष त्याचे घरी नांदतसे ॥१॥
सदा सर्व काळ विठ्ठल चिंतन । करिती कीर्तन दिवस राती ॥२॥
ते माझे सोयरे सज्जन सांगाती । जे आठविती विठोबासी ॥३॥
चोखा म्हणे ते परलोकीचे सखे । गाती नाम मुखे विठाबाचे ॥४॥
