वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

ठाव तुम्हापाशी । झाल

🙏 3. संत तुकाराम · ABH-080474 · अभंग क्र. ३२४२

3242.
ठाव तुम्हापाशी । झाला आता हृषीकेशी ॥१॥
न लगे जागावे सतत । येथे स्वभावे हे नीत ॥धृपद॥
चोरट्यासी थारा । येथे कैचा जी दातारा ॥२॥
तुका म्हणे मने । आम्हा झाले समाधान ॥३॥

अर्थ :
हे ऋषिकशी आता आमचा आश्रयस्थान तुमच्या पाया जवळच आहे. तुमच्या पायाजवळ सतत जागृत राहावे लागत नाही हे तुमच्या पायाचे वैशिष्ट्य आहे, स्वभाव आहे, धर्मनीती आहे. हे दातारा तुमच्या पायाजवळ कामक्रोध रुपी षडविकार तसेच काळ रुपी चोरांना थारा कसा मिळेल? तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या मनाला तुमच्या पायाजवळ थारा मिळाला आहे त्यामुळे माझे मन समाधानी झाले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग