जयांचे पाहता श्रीमुख
647.
जयांचे पाहता श्रीमुख । हरे कोटी जन्म दुःख ॥१॥
तो हा उभा विटेवरी । भक्तकाज म्हणवी कैवरी ॥२॥
वेदासी जो दुर्गम । आम्हा कळले तयांचें वर्म ॥३॥
ऐसा भक्तवत्सल तो एक दीनानाथ । एका जनार्दनी तया ध्यान ॥४॥