सांगे मातेप्रती सापत
3435.
सांगे मातेप्रती सापत्नें लोटिलें । म्हणोनी वाटलें दु:ख मज ॥१॥
येरी म्हणे बाळा नको करु खेद । दैव नाही शुध्द आपुलें ते ॥२॥
आपुलिया दैवीं देवे जे लिहिलें । भोगणें प्राप्त जाहलें आपणांसी ॥३॥
एका जनार्दनी देवाविण शीण । निवारील कोण दुजा बापा ॥४॥
