बाळ कृष्ण रांगे नंदा
62.
बाळ कृष्ण रांगे नंदाघरीं । चोरी करी घरोघरी गौळणी धरूनिया करी । घेऊन नंदमंदिरा आली ॥१॥
गार्हाणे सांगती अबला नवलविंदान तयाची ती कळा । हांसत उभा यशोदे जवळा पाहूनिया बाळा चाकाटली ॥२॥ राहिले बोलणें चालणेंनिवांत । कृष्णरुपी वेधले चित्त । एका जर्नादनी समाधिस्त । द्वैताद्वैत विसरली ॥३॥
