धिग् धिग् तो ग्राम ध
23.
धिग् धिग् तो ग्राम धिग् धिग् आश्रम ।
संत समागम नाही जेथे ॥१॥
धिग् ते संपत्ती धिग् धिग् ते संतति ।
भजन सर्वाभूति नाही जेथे ॥२॥
धिग् तो आचार धिग् तो विचार ।
वाचे सर्वेश्र्वर नाही जेथे ॥३॥
धिग् तो वक्ता धिग् तो श्रोता ।
पांडुरंग कथा नाही जेथे ॥४॥
धिग् ते गाणे धिग् ते पढणे ।
विठ्ठल नाम बाणे नाही जेथे ॥५॥
नाम म्हणे धिग् धिग् त्यांचे जिणे ।
एका नारायणे वांचुनिया ॥६॥
संत नामदेव नाम, टाळी, घोष, किर्तन, महात्म्य
