गोकुळी गोपिका गोपाळ
531.
गोकुळी गोपिका गोपाळ सकळ | मध्ये घननीळ क्रीडा करी ॥१॥
करी खेळ मोठा स्थापिले निशाण | स्वये नारायण हांका मारी ॥२॥
मारियेला कंस दुर्घट दुर्जना | पुरवी वासना पांडवांची ॥३॥
पांडवांचे ध्यान धरुनि अंतरी | नामा म्हणे हरि साह्य करी ॥४॥
