आजि आनंदु रे एकी परम
3949.
आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥१॥
विठोबाची वेडी आम्हा आनंदु सदा । गाऊ नाचो वाहु टाळी रंजवू गोविंदा ॥धृपद॥
सदा सन सांत आम्हा नित्य दिवाळी । आनंदे निर्भर आमचा कैवारी बळी ॥२॥
तुका म्हणे नाही जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक हे तो आमुचे कवतुक ॥३॥
अर्थ :
आज आम्हाला आनंद झाला आहे कारण आम्हाला परमानंदाची प्राप्ती झाली आहे ज्या गोविंदाला श्रृती, नेती नेती म्हणत आहेत त्या गोविंदाची प्राप्ती आम्हाला झाली आहे. आम्ही विठोबाची वेडी मुले आहोत त्यामुळे आम्हाला नेहमी आनंदच आहे आम्ही विठोबाचे नाम गाऊ, त्याच्या आनंदात नाचू, नृत्य करु व टाळी वाजवून गोविंदाला रंजवू. आनंददायक दिवाळीसारखा सण आमच्याजवळ नेहमीच आहे अशा प्रकारे आमच्या ठिकाणी गोविंदाचा आनंद परिपूर्ण भरलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला जन्ममरणाचे भयच नाही संत सनकादिक हेच आमचे कौतुक आहेत.
