महालक्ष्मी ३९१४ ते ३
3914.
महालक्ष्मी ३९१४ ते ३९१५
नमो आदि माया भगवती । अनादिसिद्ध मूळ प्रकृति । महालक्ष्मी त्रिजगती । बया दारउघड दार उघड ॥१॥ हरिहर तुझे ध्यान करिती । चंद्र सूर्य कानी तळपती । गगनाचे प्रावर्ण रूळती । ते तारांगणे भांगी भरिलें मोती । क्या० ॥२॥ नवखंड पृथ्वी तुझी चोळी । सप्तपाताळी पाउलेंगेलीं । एकवीस स्वर्ग मुगुटी झळाळी॥बया० ॥३॥ अलक्षपूर भवानी दार उघड बया । माहूर लक्ष्मीदार उघड बया । कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बया । तैलंग लक्ष्मी दार उघड बया । तुळजापूर लक्ष्मीदार उघड बया । पाताळ लक्ष्मी दार उघड बया । कानाड लक्ष्मी दार उघड बया । अष्टभुज लक्ष्मीदार उघड बया । पढंरपूर निवासिनी दार उघडबया । उदो उदो उदो उदो ॥४॥चारी पुरूषार्थगोंधळी । सनकादिक तेथे संबळी । तेहतीस कोटीभूतावळी । अठ्याऐंशी सहस्त्र ऋषी मंडळी । दिवट्या पाजळोनी तिष्ठती बया०॥५॥वेताळफेताळ खंकाळ । मेसको मारको मैराळ । जानाईजोखाई क्षेत्रपाळ । म्हैशासुर दैत्य मतला सबळ । अबबब पीडा गेली अंबे दार उघड ॥६॥ मच्छाईबया दार उघड । कच्छाई बया दार उघड । व-हाईबया दार उघड । नरसाई बया दार उघड । वामनाई बया दार उघड । परसाई बया दार उघड । रामाई बया दार उघड । कृष्णाई बया दार उघड । बोधाई बया दार उघड । कलंकाई बया दार उघड । महालक्ष्मी बया दार उघड । उदो उदो उदो ऐसाशब्द गाजतो । कामक्रोध दैत्यावर कोरडा कडाडावाजतो । ज्ञानपोत पाजळतो । बोध परडी हातीघेतों । प्रेमाचा पाऊल पुढे ठेवितो । अहं शंकासुरदैत्य बळी देतो । बया दार उघड ॥७॥ हिरण्याक्षहिरण्यकशिपु कोंबडे पिळी । बळीसी घालुनीपाताळी । सहस्त्र अर्जुनासी हातोफळी । हनुमंतदिवटा महाबळी । अठरा पद्म घेऊनी रणकल्लोळी । सागर बांधोनियां शिळी । करी लंकेची होळी । रावण कुंभकर्ण मातले बळी । तेथे तू खेळसीशिरांची चेंडूफळी । बया दार उघड ॥८॥ शरणआला तुज बिभीषण । तयासी राज्यीं अक्षईस्थापुन । प्रल्हाद उपमन्यु ध्रुवासी भातुकें देऊन । बुझाविसी कवतुके बया दार उघड ॥९॥ आणिकएक अंबे नवलपरी । तुझी यात्रा कलियुगामाझारी । अविंगल दृश्य परोपरी । निंबनारळ घेउनी करी । हळदी कुकूम अर्पिती । बया दार उघड ॥१०॥ वहान तुझे सिंह केसरी । मोकळे केस त्रिशुळ शंखकरी । शिशुपाळ वक्रदंत दोन्ही बकरी । आहुतीघेसी जगदंबे । बया दार उघड ॥११॥ तेथुन पुढेदसरा आला । अठरा दिवस घट मांडीला । कौरवपांडव सैन्य मेळ मिळाला । तेथे शोभसीविराजमान हो दुर्गे । बया दार उघड॥१२॥जयजयाजी मुळ पीठेंद्र भवानी । पांडव कुळींचीकुळस्वामीनी । अर्जुनरथी स्वार होऊनीं । वागदोरहाती धरोनी । रथ फिरविला कवतुके । बया दारउघड॥१३॥द्रौपदी बहीणीचेनी कैवारेंसी । होमकरूनी कुरूक्षेत्रासी । तुझे साहित्ये पुर्णाहुतीसी । ते तुजप्रती अर्पिले वो जगदंबे । बया दारउघड ॥१४॥रणवाद्य भम् भम् दण् दण् कड् कड्वाजती । तोची गोंधळ अंबे तुजप्रती । रणस्वाद पटस्थापिला मध्यवर्ती । प्रथम धुप घटाप्रती । भीमसुत बभु अर्पिला । बया दार उघड ॥१५॥ ऐसारण उत्सव मांडीला । उदो उदो ऐसा शब्द झाला । तेंव्हा अर्जुन भक्त झडपीला । संशय सूत्रं ते काळी । महाशक्ती कृष्णाबाई । बया दार उघड ॥१६॥संशय भूत असे कठीण । हरिहर ब्रह्मासी नाटोपेजाण । चारी वेद सहा शास्त्रे अठरा पुराण । अठ्याऐंशी सहस्त्र ऋषी शिणले जाण । मग त्वांबोध खंडा हाती घेऊन । शिरछेदीले भूतांचे । बयादार उघड ॥१७॥बया त्वा रणकुंड जबडापसरिला । आहुती घेसी दोन्ही दळा । रथ घोडेकुंजर तुला । नारळ तुला अर्पिला । बया दारउघड ॥१८॥भीष्म द्रोण ही कुळें । तीळ तांदुळपायदळे । आणिकही वीर भले भले । निबें कापुनीटाकीलीं । बया दार उघड॥१९॥रक्त वाहेभडभडा । तेची तेल घृत जळे धडधडा । कौरवपतंग पडती गाढा । दुर्योधन हा लक्ष्मी तुझा रेडा । शेवटी आहती घेसी तयाची । बया दारउघड ॥२०॥ शिलंगण खेळसी नानापरी । कौरवकुळींची करूनी बोहरी । द्वारका लपवोनि समुद्री । यादवकुळ पाठविसी माहेरी निजधामा कारणे । बया दार उघड॥२१॥पुढें जंबुद्वीपभीतरी । अंबेतुझी न वर्णवें थोरी । खेळ खेळसी वैष्णवांमाझारी । पुंडलीक दिवटा महाभारी । पोत पाजळुनी करी । ओवाळीसी महामाया । बया दार उघड ॥२२॥ मग जगदंबा प्रसन्न झाली । भक्तीची कवाडे उघडीकेली । शंख चक्राकिंत शोभली । रूप सुंदर सावळी । कोटी चंद्र सूर्य प्रभावळी । बया दार उघड॥२३॥एका जनार्दनी माउलीं । करी कृपेची साउली । भक्त जया कारणे । बया दार उघड ॥२४॥
