वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 244. महालक्ष्मी ३९१४ ते ३९१५

नमो निर्गुण निराकर ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090335 · अभंग क्र. ३९१५

3915.
नमो निर्गुण निराकर । आदि मुळमाया तू आकार । महालक्ष्मी तू साचार । उघडे दारठेऊनी बैसलीस बया॥१॥बया दार लाव । बयादार लाव॥ध्रु.॥घेउनी दहा अवतार । करिसीदुष्टांचा संहार । आकार सारूनी निराकार । कायबैसलीसा बया दार लाव॥२॥बैसलीसें क्षीरसागरीशेषाचें पलंगावरी।जय विजय द्वारी । प्रेम दिवटेंतिष्ठती । बया दार लाव ॥३॥ ते वेळी देव आले । शंखासुरे म्हणती पीडीलें । वेद चारी चोरूनी नेलेंब्रह्मयाचें । बया दार लाव ॥४॥ त्वा मत्स्यरुप धरुन । समुद्रांत बुडी देऊन । शंखा सुरास वधुन । वेदघेउनी आलीस । बया दार लाव॥५॥सुर असुरमिळाले । समुद्र घुसळावयास गेले । वासुकींचे दावेलावीलें । तेथे संकटी पडीले । बया दार लाव ॥६॥ तु कुर्मरुप धरुन । मंदराचळ पृष्ठी वाहुन । चवदारत्ने काढुन । इंद्र सुखी केला । बया दार लाव ।७॥वरदें हिरण्याक्ष माजला । पृथ्वी काखेत घेऊनीपळाला । चंद्र सुर्य घेऊनी गेला अंध:कार पडीला । बया दार लाव॥८॥त्वां वराहरूप धरुन । दैत्यांसक्रोधे वधुन । पृथ्वी दाढेवरी धरुन । चंद्र सुर्यआणिला । बया दार लाव॥९॥दैत्यकु ळीहिरण्यकश्यपु जन्मला । तेणे तुझा भक्त गांजीला । ते ते न पहावे तुजला । त्वा उग्ररुप धारिलें । बयादार लाव॥१०॥त्वां क्रोधे स्तंभ फोडुन । नारसिंहरुपधरुन । दैत्यासी वधुना प्रल्हाद दिवटा रक्षिला । बया दार लाव॥११॥दैत्यकुळी बळी जन्मला । तेणे पुण्याचा उत्कर्ष केला । देखोनि इंद्र घाबरला । शरण आला तुज बया । बया दार लाव ॥१२॥ वामनरूप धरुन । बळीस पाताळी घालुन । शुक्राचा एकं नयन फोडिलास । बया दार लाव ॥१३॥ सहस्त्र अर्जुन पीढीलें । देवा तेणे गांजिलें । ऋषींचे याग खोळंबलें । हे न पहावे तुझेनी । बयादार लाव ॥१४॥मग तुं परशुराम रुप धरुन । सहस्त्रार्जुनास वधुन । मातेचे शिर छेदुन । क्षत्रियकुळ निवटीले । बया दार लाव॥१५॥शिव वरदेंरावण कुंभकर्ण । तेहतीस कोटी बंदी घालुन । नवग्रह पायरी करुन । राज्य करी आनंदें । बयादार लाव॥१६॥सीतेचेनी कैवारें । रावण मारिलासहपरिवारें । अठरा पद्म वानरे । गोंधळ मांडीलालंकेसी । बया दार लाव॥१७॥कौरव पांडवमिळालेंकुरुक्षेत्रीं युध्द मांडिले । अठरा अक्षोहिणीदिवटे भले । नाचती रणकल्लोळीं । बया दारलावा।१८॥बौध्द अवतार घेऊन । विटे समचरणठेऊन । पुंडलिक दिवटा पाहुन । तयाचे द्वारीगोंधळ मांडीला । बया दार लाव॥१९॥आणिकदिवटे अपार । निवृत्ती ज्ञानदेव सोपाना खेचर । मुक्ताई जनाबाई विसोबा गोराकुंभार । रोहीदासचोखा सजन नाचती । बया दार लाव ॥२०॥ सावता नामा दामा जाण । नारा महादा गोंदा विठाकबीर कमाल पूर्ण । सेना जनमित्र नरसी ब्राह्मणदिवटे तिष्ठती । बया दार लाव ॥२१॥ आषाढीकार्तीकी गोंधळ मांडीला । उदो उदो ऐसा शब्दझाला । कामक्रोधादिका पळ सुटला । उदो शब्दऐकोनी । बया दार लाव ॥२२॥ पुढे कलीचा प्रथमचरण । दैवते राहीली लपुन । तीर्थ सांडोनीमहिमान । अठरावर्ण एक झाले । बया दार लाव॥२३॥म्लेंच्छे गांजीले देवभक्तां । महिमाउच्छेदिला सर्वथा । न चले जप तप तत्वंता । एकरुप सर्व झाले । बया दार लाव॥२४॥मत्स्याईबया दार लाव बया । कुर्माई बया दार लाव. बया । वहाई बया दार लाव बया । नरसाई बया दार लावबया । वामनाई बया दार लाव बया । परसाई बयादार लाव बया । रामाई बया दार लाव बया । कृष्णाईबया दार लाव बया । बौध्दाई बया दार लाव बया । कलंकाई बया दार लाव बया । महालक्ष्मी बयादार लाव बया ॥२५॥ उदे उदे उदे बया दार लाव ॥२६॥ काम महिषासुर मातला । तेणे विषय गोंधळमांडीला । अज्ञान पोत पाजळला । आशा संभळालावुनी । बया दार लाव ॥२७॥ क्रोध वेताळ दारुण । मातलासे मदे करुन । मत्सर मदे सहाय्य होऊन । भक्ति वैराग्य बुडविलें । बया दार लाव ॥२८॥ दंभें झोटींग महाबळी । अहंकार मुंजा छळी । आशामनशा तृष्णा घेउनी गोंधळी । विषयकल्लोळीनाचतु । बया दार लाव ॥२९॥ कल्पना इच्छावासना भुतावळी । औट कोटीया मिळाली । नाचतीविषयकल्लोळी । भोग दिवटी घेउनी । बया दारलाव ॥३०॥ ऐसे तुज न पहावे जाण । म्हणोनीबैसलिस मौन धरुन । विटेवरी समचरण ठेऊन । निवांत रूपे बया दार लाव॥३१॥एका जनार्दनीशरण । विठ्ठलनामें अंबा जाण । पुंडलिक दिवटाअवलोकुन । निवांत रूपे बैसलीं बया दारलाव॥३२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग