वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(सौरी, स्वैरिणी)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079370 · अभंग क्र. ३९६५

3965.
(सौरी, स्वैरिणी)
सौरी सुर झाले दुर डौर घेतला हाती । माया मोह सांडवले तीही लोकी झाले सरती ॥१॥
चाल विठाबाई अवघी पाच देही । न धरी गुज काही वाळवंटी सांपडता ॥धृपद॥
हिंडोनि चौऱ्यांशी घर आले तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठी आंचवले संसारा ॥२॥
लाज मेली शंका गेली नाचो महाद्वारी । भ्रांति सावले फिटोनि गेले आता कैची उरी ॥३॥
झाले भांडी जगा सांडी नाही भीड चाड । घालीन चरणी मिठी पुरविन जीविंचे ते कोड ॥४॥
तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आता तुम्हा आम्हा कैसी झाली जीवे साटी ॥५॥

अर्थ :
मी सौरी सर्व स्वैरींमध्ये शूर झाले कारण मी माझ्या हातामध्ये डौर म्हणजे डमरु घेतला आहे त्यामुळे मी माझी माया आणि मोह दूर लोटून दिले असून तीन्ही लोकांमध्ये मी सरती (मान्य) झाली आहे. हे विठाबाई माझ्या पंचमहाभूतात्मक देहामध्ये तू चाल आता आपण दोघे मिळून गुह्य गोष्टी बोलू तू मला चंद्रभागेच्या वाळवंटात सापडली आहेस म्हणून कोणत्याही गोष्टी गुह्य ठेवू नकोस. हे विठाबाई मी चौ-याऐंशी लक्ष योनी घर हिंडून तुझ्या दारापर्यंत आली आहे तुझ्या एकरुक्यासाठी म्हणजे भक्तिप्रेमरुपी पैशासाठी संसाराला त्यागले आहे. आता आमची लाज मेली, शंका नाहिसी झाली, कोणाचेही भय आम्हाला राहिले नाही आम्ही आता हरीभजनामध्ये महाव्दारात आनंदाने नाचत आहोत आणि देहात्म भ्रांतीचे वस्त्र फिटून गेल्यामुळे खाली उरलेच काय आहे ? आता मी भांडखोर झाले असून सर्व जगाने माझा त्याग केला आहे मला कोणाचीही भीड किंवा आवड राहिली नाही आता मी तुझ्या चरणाला मिठी घालून माझ्या आवडीचे सर्व कोड पूर्ण करुन घेणार आहे. तुकाराम महार
1:17

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग