जया नामाचा विश्वास ।
889.
जया नामाचा विश्वास । धन्य तेंचि हरिचे दास । वंदीन पायंस । वारंवार तयांच्या ॥१॥
कुळ तारिले सकळ । वाचे नामावळी अढळ । गाती रामनाम सरळ । नोहे क्षण आराणूक ॥२॥
ते भाग्याचे नरीनर । ज्यांचा ऐसा निर्धार । एका जनार्दनी साचार । दृढ भाव रामनामी ॥३॥
