वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ८, आंधळे अभंग

पूर्वप्राप्‍ती दैवयो

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073091 · अभंग क्र. १००

100.
पूर्वप्राप्‍ती दैवयोगे पंगु झालो मी अज्ञान । विषय बुंथी घेऊनिया त्‍याचे केले पोषण ।
चालता धर्म बापा विसरलो गुह्य ज्ञान । अवचटे गुरुमार्गे प्रगट बह्माज्ञान ॥१॥
दाते हो वेग करा कृपाळु बा श्रीहरि । समता सर्व भावी शांती क्षमा निर्धारी ।
सुटेल विषयग्रंथी विहंगम आचारी ॥२॥
शरण रिघे सद्गुरु पाया पांग फिटेल पांचाचा । पांगुळले आपेआप हा निर्धारु पै साचा ।
मनामाजी रुप घाली मी माजी तेथे कैचा । हरपली देह बुध्दि एकाकार शिवाचा ॥३॥
निजबोधे धवळा शुध्‍द यावरी आरुढ पै गा । क्षीराब्‍धी बोध वाहे तेथे जाय पा वेगा ।
वासना माझी ऐसी करी परिपूर्ण गंगा । नित्‍य हे ज्ञान घेई अद्वैत रुप लिंगा ॥४॥
पावन होशी आधी पांग फिटले जन्‍माचा । अंधपंग विषयग्रंथी पावन होशील साचा ।
पांडूरंग होसी आधी फळ पीक जन्‍माचा । दृष्‍टी बुध्‍दीटाकी वेगी टाहो करी नामाचा ॥५॥
ज्ञानदेव पंगुपणे पांगुळली वासना । मुराले ब्रह्मी मन ज्ञेय ज्ञाता पुरातना ।
दृश्‍य हे लोपले बापा परती नारायणा । निवृत्‍ती गुरु माझा लागो त्‍याच्‍या चरणा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग