दग्धही होतसे आले जे
665.
दग्धही होतसे आले जे आकारा | असोनि निर्धारा नाम नाही ॥१॥
नाम अनुभवे प्रपंची हो ब्रह्म | जाहला सर्वोत्तम संत कृपे ॥२॥
म्हणोनिया संता जाऊनि शरण | साधावे निधान नाम ब्रह्म ॥३॥
नामदेव म्हणे संताचिया कृपे | माजी नाम सोपे नांदतसे ॥४॥
