(कैकई)
3943.
(कैकई)
ऐक बाई तुज वो काही सांगते शकुन । निजलिया भुर होसी जागे म्हणउन ॥१॥
मान्य माझे केले सांगते एका बोले । न येता हे भले कळो कोणा लोकांसि ॥धृपद॥
सांगते गुण जीवींची खुण ऐक माझी मात । बैस एका भावे माझे हाती दे वो हात ॥२॥
बरवा घरचार तुज सापडला ठाव । फळ नाही पोटी येथे दिसे खोटा भाव ॥३॥
आहे तुझे हाती एका नवसाचे फळ । भावा करी साह्य चहू अठरांच्या बळे ॥४॥
करी लागपाठ चित्त वित्त नको पाहो । अखई तो चुडा तुज भोगईल ना हो ॥५॥
कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाही ठावी ॥६॥
तुका म्हणे नांद सुखे धरी आठवण । माझ्या येती कोणी त्यांचा राखे बहु मान ॥७॥
अर्थ :
शुभशकुन सांगणारे कैकेयी म्हणजे कैकाडीन म्हणते की, हे बाई मी एक शुभशकुन सांगते ते ऐक, तू जर हरीभजनामधे झोपी गेलीस तर नरकाला भुरर्कन उडून जाशील त्यामुळे तू जागृत राहा. मी जे काही एक शब्द सांगितले आहे ते संतांनी देखील मान्य केले आहेत माझे बोलणे व्यवहारामध्ये अति हुशार असलेल्या मनुष्याला देखील कळत नाही. मी तुला जीवाची खरी खूण सांगते मी सांगितलेली गोष्ट तू ऐक हरीच्या ठिकाणी एकनिष्ठ भक्तिभावाने तू बस आणि हातात हात तू दे मी तुझा हात पाहते. अरे मला तुझा हात पाहून असे दिसते आहे की, तुला घरदार, धनसंपत्ती, ऐश्वर्य सर्व काही चांगले ठिकाण मिळालेले आहे परंतु तुला हरीकृपेचे फल प्राप्ती झालेली नसून तुला मिथ्याभास होत आहे म्हणजेच हरीच्या ठिकाणी तुझा खोटा भाव मला दिसतो आहे. अरे तुझ्या हाती एक नवसाचे फळ आहे तू चार वेद आणि अठरा पुराणे यांच्या बळाने भक्तिभावाला साहाय्य कर. अरे तू सारखा गूरुचा
