वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(गोंधळ)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079578 · अभंग क्र. ३९४२

3942.
(गोंधळ)
सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी वो । नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी वो ।
विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी वो । कास पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥
अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणी गोंधळा वो । राजस तेजोराशी मिरवे शिरोमणी वेल्हाळा वो ।
कोटि रविशशिप्रभा तेजे लोपल्या सकळा वो । न कळे ब्रम्हादिका अनुपम्य इची लीळा वो ॥धृपद॥
सावळी सकुमार गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी वो ।
कटी क्षुद्र घंटिका शब्द करिताती माधुरी वो । गर्जती चरणी वाकी अभिनव संगीत नृत्य करी वो ॥२॥
अष्टांगे मंडित काय । वर्णावी रूपठेवणी वो । शोलिव शुध्द रसाची ओतिव सुगंध लावण्यखाणी वो ।
सर्वकळासंपन्न मंजुळ बोले हास्यवदनी वो । बहु रूपे नटली आदिशक्ति नारायणी वो ॥३॥
घटस्थापना केली पंढरपुरमहानगरी वो । अस्मानी मंडप दिला तिन्ही तालांवरी वो ।
आरंभिला गोंधळ इने चंद्रभागेतिरी वो । आली भक्तिकाजा कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥४॥
तेहतिस कोटि देवचामुंडा अष्टकोटि भैरव वो । आरत्या कुरवंड्या करिती पुष्पाच्या वरुषाव वो ।
नारद तुंबर गायन ब्रम्हानंद करिती गंधर्व वो । वंदी चरणरज तेथे तुकयाचा बांधव वो ॥५॥

अर्थ :
माझ्या विठाबाई माऊलीचे मुख अतिशय सुंदर आहे व तिच्या कानामध्ये मनोहर कुंडले आहेत तिच्या वेणीची आकृती नागासारखी असून तिच्या कपाळावर केशर आणि कस्तुरीचा मळवट आहे. माझ्या विठाबाई माऊलीचे नेत्र अतिशय मोठे असून तिच्या गळयामध्ये वैजयंती माळ अतिशय शोभून दिसत आहे. तिने पितांबराची कास घातलेली असून तिच्या अंगाला चंदनाची उटी अतिशय शोभून दिसत आहे. अश

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग