वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

देव ते संत देव ते सं

🙏 3. संत तुकाराम · ABH-079495 · अभंग क्र. ३९४४

3944.
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥
मी तो सांगतसे भावे । असो ठावे सकळा ॥धृपद॥
निराकारी ओस दिशा । येथे इच्छा पुरतसे ॥२॥
तुका म्हणे रोकडे केणे । सेविता येणे पोट धाय ॥३॥

अर्थ :
देव हेच खरे संत आहेत आणि संत हेच खरे देव आहेत. त्यांची मूर्ती म्हणजे केवळ उपाधीला निमित्त आहेत. मी हे सर्वांना भक्तिभावपूर्वक सांगत आहे हे सर्वांना माहितच असावे. निर्गुण, निराकाराच्या ठिकाणी सर्व दिशा ओस असतात परंतु संतांच्या ठिकाणी सर्व इच्छा पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात, संत हे रोकडा माल आहे आणि जो कोणी याचे सेवन करेल त्याचे पोट तृप्त होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग