साधन ते सार पंढरीचीव
445.
साधन ते सार पंढरीचीवारी । आन तुं न करी सायासाचें ॥१॥
वेद तो घोकितां चढे अभिमान । नाडेल तेणे जाण साधन ते ॥२॥
शास्त्रमतवाद कासया पसार । करी सारासार वारी एक ॥३॥
पुराण सांगता मन वेडावले । निंदुं जे लागले आणिकांसी ॥४॥
ग्रंथ पाहावें तरी आयुष्य क्षणीक । व्यर्थ खटपट करुनी काई ॥५॥
एका जनार्दनी सारांचे पै सार । विठ्ठल त्रिअक्षर जप करी ॥६॥
