उदंड तीर्थे पृथ्वींच
446.
उदंड तीर्थे पृथ्वींच्या ठायी । ऐसा महिमा नाही कोणे जागी ॥१॥
तया पुंडलीकें आम्हा सोपे केले । परब्रम्हा उभे ठेले विटेवरी ॥२॥
भुवैकुंठ पंढरी क्षेत्र । पवित्रा पवित्र उत्तम हे ॥३॥
म्हणोनी करा करा लाहें । एकदां जा हो पंढरीये ॥४॥
एका आगळें अक्षर । एका जनार्दनी निर्धार ॥५॥
