वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ९, श्री विठ्ठल प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५९ ते ७९०

मन हे राम जाले मन हे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074252 · अभंग क्र. ७६४

764.
मन हे राम जाले मन हे राम जाले ।
प्रवृत्ति ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले ॥१॥
श्रवण कीर्तन पादसेवन कैसे विष्णुस्मरण केले ।
अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले ॥२॥
यमनियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले ।
ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले ॥३॥
बोधी बोधले बोधिता नये ऐसे जाले ।
बापरखुमादेविवरु विठ्ठले माझे मीपण हरपले ॥४॥

अर्थ :
श्रीरामाच्या नामस्मरणामुळे माझे मन हे रामरुप झाले याची खूण मनाची सहज प्रवृत्ति नष्ट होऊन ते निवृत्ति रुपाला प्राप्त झाले. याचे साधन श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन त्याचप्रमाणे यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार ध्यान, धारणा, आसन व मुद्रा संपादन करुन कसे आपोआप समाधीला आले. शेवटी बोध्य व बोधकता आणि बोध ही त्रिपुटी नाहीसी झाली. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनीच माझे मीपण नाहीसे केले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग