वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ९, श्री विठ्ठल प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५९ ते ७९०

देखावयालागी जव अनौते

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074269 · अभंग क्र. ७६५

765.
देखावयालागी जव अनौते पहिले ।
तव तनु मनु त्रिभुवनी व्यापिले गे माये ॥१॥
नवलावो जाले जग हरिच होऊनि ठेले ।
आठवू विसरले काय करू ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठले साच केले ।
लोह परिसेंसी झगटले तैसे जाले गे माये ॥३॥

अर्थ :
हे श्रीकृष्ण अगोदर तुला मी माझ्याहून अनौते म्हणजे भिन्न समजून पहावयाला गेलो. तो शरीरांत मनांत व सर्व त्रिभुवनांत तूंच व्यापिला आहेस असे दिसले. काय चमत्कार झाला. सर्व जग हरिरुपच होऊन गेल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे हरिच आहे असे झाले. आता तुझा आठव करण्याचे विसरण्याचे असे राहिलेच नाही. लोखंडास परीस लागल्या बरोबर जसे ते सोनेच होते. त्याप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलाने माझे खरे स्वरुप मला प्राप्त करून दिले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग