वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ९, श्री विठ्ठल प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५९ ते ७९०

सिद्ध सांडूनि निजबोध

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074274 · अभंग क्र. ७६३

763.
सिद्ध सांडूनि निजबोधा गेले ।
निजबोधु मुकले ब्रह्मभुली ॥१॥
आठवेना माझे पूर्वजन्मग्राम ।
अवघाचि श्रम माझा हिरोनिया नेला ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठले वेडावले ।
आपणासहित मज ब्रह्मी बुडविले ॥३॥

अर्थ :
माझा सर्व प्रपंच सिद्ध असता यथासांग असता तो टाकून मी निजबोधाकडे गेले. त्या ब्रह्मबोधाच्या भुलीने निजबोधही विसरून गेले. त्यामुळे माझा पूर्वीचा देहतादात्म्यरुपी गांव आठवेनासा झाला आणि संसार संबंधी माझे सर्व श्रम नाहीसे होऊन गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याने मला वेड लावून आपणासह वर्तमान मला ब्रह्मस्वरुपांत बुडविले. टाकून मी असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग