वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संतसंगे शुद्ध होय चि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075865 · अभंग क्र. २९२

292.
संतसंगे शुद्ध होय चित्तवृत्ति ।
लागेल प्रवृत्ति संतसंगे ॥१॥
यालागी तयांचे करावे दास्यत्व ।
तेणे निजतत्व सापडेल ॥२॥
संतसंगे दोष नासतील सर्व ।
संतसंगे गर्व जाईल तो ॥३॥
संतसंगे तुज सापडेल निज ।
संतसंगे गुज प्रगट दिसे ॥४॥
संतसंगे दृष्टि पडेल स्वरूपी ।
संतसंगे स्वल्पी मोक्ष जोडे ॥५॥
बहेणि म्हणे संग धरावा निःसंग ।
साधनाचे अंग कळे तेव्हा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग