वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संतसंगे होय वैराग्य

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076096 · अभंग क्र. २९३

293.
संतसंगे होय वैराग्य मनासी ।
आणील शांतीसी संतसंग ॥१॥
संत हे सर्वांचे शिरोमणि थोर ।
पाहिजे निर्धार एकनिष्ठा ॥२॥
संतसंगे ज्ञान विज्ञान ठसावे ।
संतसंगे नव्हे दुःख देही ॥३॥
बहेणि म्हणे संतसंगाचा विचार ।
जाणती ते सार भक्तिवंत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग