बहु खेळतं खेळ । कळॊं
225.
बहु खेळतं खेळ । कळॊं आले सकळ । शेवटी ते निर्फळ । जाले बाळकृष्ण ॥१॥
कान्होबा पुरे पुरे आता खेळा । येता जाता श्रम जाला रे कान्होबा ॥धृ.॥
आम्ही न खेळु विटिदांडु । भोवरं लागोर्या रे चेंडु ।
एकीबेकीतें सांडु । मीतूपण अवघे खंडुं रे कान्होबा ॥२॥
लक्ष लावु तुझे खेळा । न गुंतु आणिका चाळा ।
एका जानर्दनीं पाहु डोळा तुझ्या खेळाची अगम्य लीला रे कान्होबा ॥३॥
