अगम्य तुझा खेळ न कळे
224.
अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथे आम्हा कैचे बळ ॥१॥
कान्होबा भला भला तु होसी । चोरी करुनि दिसो न देसी रे कान्होबा ॥२॥
चोरुनी शिदोर्या आमुच्या खासी । शेखी वळतीया धाडिसी रे कान्होबा ॥३॥
एका जनार्दनी आमुचा होंसी । दास्यात्व करुनी दिसो न देसी कान्होबा ॥४॥
