देवगाव माझे माहेर सा
546.
देवगाव माझे माहेर साजणी ।
शाखा वाजेसनी मौनस गोत्र ॥१॥
तयाचिये कुळी घेतले शरीर ।
स्त्रीरूपे व्यवहार दावावया ॥२॥
जयाचिये कुळी गुरूपरंपरा ।
नाहीच सादरा श्रवण काही ॥३॥
बहिणी म्हणे जन्म अंतरीचा नेम ।
हे तो जाणे वर्म नारायण ॥४॥
