वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आरती रामराजा ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076412 · अभंग क्र. ५४५

545.
आरती रामराजा ।
दशरथ-आत्मजा ।
जानकी वामभागी ।
जय लक्षमण-अग्रजा॥धृ॥
सन्मुख मारूती तो ।
पायी अखंड दृष्टी ।
चामरे छत्रधारी उभा भरत पृष्ठी ॥१॥
टाकुनी वेळ येती ।
देव तेहतीस कोटी ।
श्रीरामनाम-शब्द ।
होय गर्जना मोठी ॥२॥
अंबरी पुष्पवृष्टि ।
होय आनंद मोठा ।
धन्य हा मृत्युलोक ।
उणे केले वैकुंठा ॥३॥
ब्रह्मादि देव तीन्ही ।
सुख पाहाती डोळा ।
घोटीती लाळ तेही ।
ऐसी चुकलो वेळा ॥४॥
सुस्वर शब्दनाद ।
गाय रामनाम नारद ।
तुंबर नाचताती ।
देवा जाणविती भेद ॥५॥
तेहेतीस देव कोटी ।
पुढे उभे तिष्ठती ।
श्रीरामनाम शब्द-।
नाद दाटला नभी ॥६॥
वाजती दिव्यवाद्ये ।
शंखभेरी अनेका ।
बहेणि तिष्ठताहे ।
हाती घेऊनी पादुका ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग