तुकाराम रूपे प्रत्यक
501.
तुकाराम रूपे प्रत्यक्ष बोलत ।
होई सावचित्त सावधान ॥१॥
पाहे परतोनी आपुलिया दिठी ।
सांगितली गोठी येक कानी ॥२॥
तयाचा उच्चार करू नये वाचे ।
जालेसे चित्ताचे समाधान ॥३॥
बहेणि म्हणे मना केलासे प्रकाश ।
आस्तया उदयास ठाव नाही ॥४॥
